निकालाची उत्कंठा संपुष्टात

२६ जून २०२४ रोजी मतदान घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कल १ जुलै रोजी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील निवडणूक निकालाची उत्कंठा आता संपली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरुध्द विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील उमेंदवारांमध्ये तुल्यबळ लढत झाली.मुंबई मधील पदवीधर मतदारसंघ पाठोपाठ शिक्षक मतदारसंघाची जागादेखील ‘शिवसेना'ने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिंकत ‘मुंबई'चा गड आपलाच असल्यावर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते ॲड. अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयाला गवसणी घातली आहे. या मतदारसंघात एवूÀण ८ उमेदवार नशीब अजमावत होते. ‘शिवसेना'चे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुंबई शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर सर्वाधिक पसंतीक्रमाची ४ हजार ८३  मते मिळवून मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांचा विजय झाला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एवूÀण १३ उमेदवारांनी मतदारांना कौल लावला होता. मात्र, या मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी १ लाख ७१९ मते मिळवून विरोधकांना पराभवाचे अस्मान दाखवले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रमेश श्रीधर कीर यांना २८ हजार ५८५ मते पडली. मुंबई, नाशिक, कोकण विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान झाले होते. या चारपैकी शिवसेनाकडे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघ, भाजपकडे कोकण पदवीधर मतदारसंघ, शिवसेना शिंदे गटाकडे नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ समाजवादी गणराज्य पक्षाकडे होता. मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा गेली ३० वर्षे जिंकण्याचा ‘शिवसेना'चा शिरस्ता या निवडणुकीतही कायम राहिला आहे. या मतदारसंघात ‘भाजप'ने लढत थेट होईल याची काळजी घ्ोत ‘शिवसेना' तर्फे (शिंदे गट) डॉ. दीपक सावंत यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता. भाजप उमेदवार किरण शेलार यांच्यासाठी ‘भाजप'ने सर्व यंत्रणा राबवत पहिल्यांदाच या जागेसाठी जय्यत तयारी केली होती. मात्र, या मतदारसंघात शिवसेना विरुध्द भाजप यांच्यामध्ये झालेल्या थेट लढतीत शिवसेना नेते ॲड. अनिल परब ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयी झाले. तर भाजप उमेदवार किरण शेलार यांना केवळ १८ हजार ७७२ मते मिळाली. जिंकून येण्यासाठी ३२ हजार ११२ मर्ताचा कोटा आवश्यक होता. मात्र भाजप उमेदवाराला निम्मी मते देखील मिळाली नाहीत. मुंबई शिक्षक मतदारसंघातील चौरंगी लढतीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ज. मो. अभ्यंकर विजयी झाले. महायुतीतील तिन्ही पक्षांनी परस्पर उमेदवार उभे केल्याचा फायदा ज. मो. अभ्यंकर यांना झाला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे (अजित पवार गट) उमेदवार शिवाजीराव नलावडे, भाजप उमेदवारे शिवनाथ दराडे, शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे आणि ‘समाजवादी गणराज्य पक्ष'चे उमेदवार सुभाष मोरे असे तगडे उमेदवार रिंगणात असल्याने मुंबई शिक्षक मतदारसंघातील लढतीत ज. मो. अभ्यंकर यांचा निसटत्या मतांनी विजय झाला. एवूÀणच राज्य विधान परिषदेच्या मुंबई मधील दोन पैकी दोन्ही जागा जिंवूÀन ‘शिवसेना'ने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुंबईवरील वर्चस्व कायम ठेवले आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 छत कोसळण्याच्या भयाखाली व्यापार