म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
एस आर दळवी (I) फाऊंडेशनद्वारे बेलापूर येथे वृक्षारोपण
नवी मुंबई : शिक्षक सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन विषयांवर कार्यरत असणाऱ्या एस आर दळवी (I) फाऊंडेशन च्या वतीने २९ जून रोजी सेक्टर ८, बेलापूर येथे वृक्षरोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी या संस्थेद्वारे अनेक उपक्रम राबवले जात असतात.
संस्थेचे संस्थापक रामचंद्र (आबा) दळवी व श्रीमती सीता रामचंद्र दळवी, श्रीराम इंटरप्राइसेसचे कर्मचारी तसेच सीबीडी बेलापूर भागातील रहिवासीही या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन या कार्यक्रमास सुरुवात झाली व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.