चिवणी मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

उरण : पावसाळ्यात खाडीकिनारी चिवणीी मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहेत. चिवणीी मासे बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने खवय्ये आनंदी झाले आहेत. सध्या २०० ते ५०० रुपये दराने चिवणीी मासे वाटा  मिळत आहे. विविध ठिकाणी चिवणीी माशांचे दर कमी-अधिक आहेत. उरण तालुक्यातील सिडको फाटा येथे डोंगरी, पाणजे, नवीन शेवा येथून मच्छी विक्रेते चिवणीी मासे विकण्यासाठी उरण बाजारात येत आहेत. उरण शहरातील कोट नाका, उरण चारफाटा येथे चिवणीी मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची खूपच गर्दी असते .

खाडीमुखाच्या भागात चिवणीी मासे अधिक प्रमाणात सापडतात. मात्र, खाडीकिनारा प्रदूषित झाल्याने चिवणी माशांचे प्रमाण घटले आहे. खाडीकिनारी चिवणीी मासे अंडी घालतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला गाबोळी म्हणजेच पोटात अंडी असलेले चिवणीी मासे अधिक सापडतात. मासेमार आणि स्थानिक मोठ्या प्रमाणात चिवणी मासे पकडतात. सध्या चिवणी माशांची आवक वाढल्याने खवय्ये आनंदी आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचना

चिवणी माशांची त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट असते. त्यामुळे चिवणी मासे हातात धरताना सटकतात. या माशांच्या डोक्याजवळ टणक अणकुचीदार काटा असतो. त्यामुळे मासा सांभाळून पकडावा लागतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते.

साफ करण्याची कला

चिवणी मासा साफ करण्यासाठी चुलीतील राख वापरतात. राख नसेल तर तांदळाचे पीठ वापरतात. चिवणी माशाच्या डोक्याजवळील काटा हातात राखाडी घेऊन मोडावा लागतो. काहीजण तो सुरी किंवा विळीने कापून टाकतात.

पावसाळी हंगामातील पहिलेच चिवणी मासे असल्याने या माशांना खूप मागणी आहे. खवय्ये चिवणीी मासे खरेदीसाठी तुटून पडत आहेत. काही दिवसांनी पाऊस सुरु झाल्यावर आवक वाढल्यानंतर चिवणीी मासे स्वस्त होणार आहेत. या माशांच्या अंड्यांना मोठी मागणी असते. गाभोळी चिवणी माशांना भाव जास्त मिळतो. चिवणीी माशांना किमत देखील चांगली मिळते. - किशोर घरत, मासळी विक्रेते - नवीन शेवा, उरण.

चिवणी मासे खूप चविष्ट असतात. पावसाळी मोसमात मिळणारे  चिवणी मासे आवर्जुन खातो. स्वतः जाळे घेऊन चिवणी मासे पकडायला जातो. वलगणीत देखील चिवणी मासे सापडतात. - निर्मला घरत,  सावरखार - उरण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ रेल्वे स्टेशन परिसराची लोकसहभागातून स्वच्छता