‘केडीएमसी'तर्फे १०वी, १२वी च्या विद्यार्थ्याना करियर मार्गदर्शन  

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १०वी आणि १२वी मधील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुवत डॉ. इंदु राणी जाखड, अतिरिवत आयुवत धैर्यशील जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, ‘आर्ट ऑफ लिव्हींग'च्या प्रशिक्षक नील पांडे, कृतिका, आदि उपस्थित होते.

‘आर्ट ऑफ लिव्हींग'च्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा आयुष्यातील चांगले निर्णय घेण्यास उपयोग होईल, असे आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी मार्गदर्शनात सांगितले. शाळेत मुले शिकतात आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना घडविते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढील प्रोफेशन निवडताना काळजीपूर्वक निवडावे, अशाही सूचना डॉ. जाखड यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या.

आपले कौशल्य आणि ज्ञान अद्यावत केले तर यशप्राप्ती फार दूर नाही. यशस्वी करिअरसाठी प्रथम स्वप्न बघायला शिकावे. सवयी चांगल्या असतील तर यश लवकर मिळेल. आपले पॅशन ओळखायला शिका आणि योग्य करिअर निवडा. करिअरसाठी विचारपूर्वक आखणी करुन आपले उद्दिष्ट्ये निश्चित करा, असे आपल्या ओघवत्या भाषा शैलीत विविध उदाहरण आणि सादरीकरणांच्या माध्यमातून सांगत ‘आर्ट ऑफ लिव्हींग'चे प्रशिक्षक नील पांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.

‘आर्ट ऑफ लिव्हींग'च्या प्रशिक्षक कृतीका यांनी देखील उद्‌भोदक गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महापालिका अतिरिक्त आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले.

सदर कार्यक्रमास १०वी आणि १२वी मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी आभार प्रदर्शन केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 दहावी नंतर नेमके काय? मार्गदर्शनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेचा पुढाकार