नेरुळ येथील ‘फकिरा मार्केट'ची महापालिका तर्फे स्वच्छता

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका द्वारे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४' अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली नेरुळ सेक्टर-१५ येथील फकिरा मार्केटमध्ये महापालिका सहाय्यक आयुक्त तथा नेरुळ विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे आणि स्वच्छता अधिकारी दिनेश वाघुळदे यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

२८ जून रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहीम मध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षकांसमवेत मार्केट मधील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विशेष स्वच्छता मोहीम मध्ये फकिरा मार्केटची अंतर्गत तसेच बाह्य परिसर सफाई करण्यात आली. यावेळी स्वच्छतेविषयीची सामुहिक शपथ घेण्यात आली.

प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिकचा आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करा, असे आवाहन यावेळी नेरुळ विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिकेची प्लास्टिक विरोधात कारवाई