विजय नाहटा फाऊंडेशन तर्फे स्वस्त दरात कांदा वाटप

नवी मुंबई : ‘विजय नाहटा फाऊंडेशन'चे संस्थापक-अध्यक्ष  तथा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी स्वस्त दरात कांदे वाटप उपक्रम सुरु केला आहे .

‘विजय नाहटा फाऊंडेशन' तर्फे नवी मुंबई शहरातील सानपाडा, नेरुळ (पूर्व), नेरुळ (पश्चिम), दारावे गाव, शिरवणे, आग्रोळी गाव, वाशी येथील नागरिकांना २७ जून रोजी स्वस्त दरात कांदे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो महिलांनी स्वस्त दरात कांदे घेण्यासाठी उपस्थिती लावली होती.

याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या सोबत शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, रोहिदास पाटील, मिलिंद सूर्यराव, नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने, अजित सावंत, नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख सौ.सरोजताई पाटील, भावेश पाटील, संजय भोसले, नवी मुंबई कामगार सेना प्रमुख प्रदिप बी.वाघमारे अविनाश जाधव, गणेश पावगे, सूर्यकांत झेंडे, मनोज भोईर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले असून, महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातून कांदा गायब होत चालला असल्याचे लक्षात घेऊन महिलांच्या बजेटला थोडासा हातभार लागावा, या हेतूने ‘विजय नाहटा फाऊंडेशन' तर्फे स्वस्त दरात कांदे वाटप उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पुढील काही दिवस सातत्याने नवी मुंबईतील विविध परिसरामध्ये शिवसेना शाखांमधून स्वस्त दरात कांदे वाटप उपक्रम राबविण्यात येणार आहे. - विजय नाहटा,  संस्थापक-अध्यक्ष - विजय नाहटा फाऊंडेशन, नवी मुंबई. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कै. प्रशांत पाटील यांना विविध पक्षीय मान्यवरांची श्रध्दांजली