एपीएमसी धान्य बाजारातील रस्त्यावर स्टॉलधारकांचा कब्जा?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) एपीएमसी धान्य बाजारातील स्टॉलधारकांनी त्यांचे साहित्य रस्त्यावरच विक्रीसाठी ठेऊन रस्ता अडवला आहे.त्यामुळे एपीएमसी धान्य बाजारात चालताना ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

वाशी मधील एपीएमसी बाजार आवारात एपीएमसी प्रशासनाने काही लहान व्यावसायिकांना व्यवसायासाठी स्टॉल  वितरीत केले आहेत. मात्र, सदर स्टॉलधारक वितरीत केलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेचा वापर करत असल्याचे चित्र दिसत आहे. एपीएमसी धान्य बाजारातील स्टॉल धारक त्यांचे साहित्य थेट रस्त्यातच विक्रीसाठी ठेवत आहेत. आधीच सदर स्टॉल पदपथावर वितरीत केल्याने पादचाऱ्यांची वाट अडली आहे. आता एपीएमसी धान्य बाजारातील स्टॉल धारकांकडून रस्त्यावर साहित्य ठेवून रस्त्याची देखील अडवणूक केली जात असल्याने या ठिकाणी चालायचे कुठून?, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने एपीएमसी धान्य बाजारातील ग्राहकांची वाट मोकळी करावी, अशी मागणी या बाजारात येणारे ग्राहक करीत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘कचरा व्यवस्थापन'मध्ये  नागरिकांचा  सहभाग आवश्यक