पर्यावरण रक्षणासाठी नवी मुंबई ते नाकोडाजी-राजस्थान पर्यंत पायी प्रवास करणार

नवी मुंबई : पर्यावरणाच्या सततच्या होणाऱ्या हानीकडे लक्ष वेधून त्यावर आपल्यापरीने उपाय म्हणून नवी मुंबई ते नाकोडाजी-राजस्थान पर्यंत सुमारे एक हजार किलोमीटर पायी चालत जाण्याचा संकल्प करुन जाण्याच्या मार्गात विविध ठिकाणी सुमारे एक लाख झाडे लावण्याची घोषणा नवी मुंबईकर गायक विराग वानखेडे यांनी केली आहे.

सद्यस्थितीत भारतातील विविध महानगरांचे तापमान ५० अंश सेल्सियसपर्यंत पोहचले असून आपण वेळीच सावध झालो नाही तर आपला विनाश अटळ आहे हे लक्षात घेऊन विराग यांनी आपल्या परीने हे पाऊल उचलले असून त्यांनी स्वतः प्लास्टीकच्या बाटलीबंद पाण्याचा त्याग केला आहे. सदर उपक्रमाची माहिती देण्यासाठी २० जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की नवी मुंबई, गुजरात आणि राजस्थान असा आपला प्रवास मिशन सेव्ह मदर अर्थ १००डेज ग्रीन वॉकथॉन या मोहिमेअंतर्गत होणार आहे. या मोहिमेत विविध व्यवती, सेवाभावी संस्थाही सहभागी होणार असून जिथे जिथे वृक्षारोपण करु, त्या वृक्षांची देखभाल, संगोपनाची जबाबदारी त्या त्या शहरांतील सेवाभावी संस्था, विविध मंडळे, व्यवती घेणार आहेत. एक लाख झाडे लावण्याचा संकल्प जरी असला तरी कदाचित हा आकडा दोन लाख ते दहा लाखांपर्यंतही जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. सदर उपक्रमासाठी अणुव्रत महासभा, अणुव्रत विश्वभारती, सी. व्ोÀ. लाडला भैरुजी परिवार, लायन्स वलब, रोटरी वलब अशा अनेकांचे सहकार्य लाभले आहे. सदर उपक्रमास १५ सप्टेंबरपासून प्रारंभ केला जाईल व जवळपास १०० दिवस तो चालेल असे वानखेडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एपीएमसी आवारात पाण्याविना बाजार घटकांचे हाल?