शिक्षण संस्थामध्ये केले शैक्षणिक वस्तूंचे वाटप

नवी मुंबई : लिनेस क्लब ऑफ न्यू बाम्बे वाशीतर्फे डी आर पाटील प्राथमिक विद्यालय आणि आय सी एल प्राथमिक विद्यालय, तुर्भे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. २० जून रोजी पार पडलेल्या या उपक्रमात एकूण ८० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.

तसेच विवेकानंद केंद्राच्या वाशी येथील संस्कार वर्गातील ४०मुलांना परीक्षा पॅड, वही, कंपास पेटी, कलर्स पेन्सिल बॉक्स, पेन अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट लिनेस प्रेसिडेंट ज्योती मेहता, डिस्टिक ॲडव्हायझर रंजन गाला, प्रिन्सिपल ॲडव्हायझर ज्योती भुता, व्हाईस प्रेसिडेंट उषा तलवार, पीडीपी  छाया कारेकर, डिस्ट्रिक्ट ट्रेझरर लॉरीन. क्लब सिनियर मेंबर्स नार्वेकर मॅडम, श्रीमती संथनम, क्लब प्रेसिडेंट सुमन सिंगला, सेक्रेटरी नारायणी आयर,  ट्रेझरल वर्षा चोरे, व्हाईस प्रेसिडेंट स्मिता वाजेकर, इतर मेंबर्स अंजली पाटील, मधु शर्मा, चंद्रिका, लीला शेठ  उपस्थित होत्या. सदर उपक्रमाचे आयोजन क्लबच्या उपाध्यक्षा स्मिता वाजेकर यांनी केले होते. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 महापालिका सीबीएसई स्कूल प्रवेश प्रकिया लांबणीवर