वटपौर्णिमानिमित्त वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा
नवी मुंबई : जिजाई बालमंदिर, ठाणे शाळेच्या मुख्याध्यापक, पर्यावरणप्रेमी तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य सचिव असलेल्या सौ त्रतुजा गवस ह्यांनी वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण संवर्धन करु, झाडांची पाने, फांदी तोडणार नाही ह्यासंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी शाळेमध्ये सेवा सहयोगच्या सौ.रेश्मा घरत यांनी वडाचे रोपटे भेट दिलेले वडाचे रोपटे सौ. गवस ह्यांनी सानपाडा बाबू गेणू मैदानात लावले. या रोपटे वृक्षारोपण समयी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मुंबई जिल्हा सचिव सौ.सुकन्या गवस, सदस्य सौ.श्वेता बुधे, सौ.तृप्ती माने, सौ.अर्चना सोलकर, सौ.भाग्यश्री सावंत याही उपस्थित होत्या.