४ फाटा येथील मच्छीमार्केटचे काम पूर्णत्वाकडे

उरण : उरण मधील चारफाटा येथे ‘सिडको'च्या माध्यमातून निर्माण करण्यात येत असलेल्या मच्छीमार्केटचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्केटमुळे मच्छीविक्रेत्या कोळी महिलांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे मच्छीविक्रेत्या महिलांकडून आनंद व्यक्त होत आहे. सदर मच्छी मार्केटच्या बांधकामासाठी ‘सिडको'ने सुमारे ४ कोटींचा निधी खर्च केला आहे.

उरण चार फाटा येथे मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना मासे विक्री करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर जागेवर सुसज्ज मच्छीमार्केटची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतकडे आमदार महेश बालदी आणि माजी आमदार मनोहर भोईर व आमदार महेश बालदी यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती.

अखेर या मागणीच्या अनुषंगाने ‘सिडको'ने सुमारे ४ कोटींचा निधी खर्च करुन नव्याने अद्ययावत मच्छीमार्केट निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. सदर मच्छीमार्केटचे काम लवकरच पूर्ण होऊन ते मच्छीविक्रेत्यांसाठी उपलब्ध होणार आहे. सदर मार्केट मुळे मासळी विक्रेत्या महिलांची गैरसोय दूर होणार आहे.

दरम्यान, मच्छीमार्केटच्या कामासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी ‘सिडको'चे द्रोणागिरी नोड कार्यकारी अभियंता मोहन मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळ्यातील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज - व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा