पनवेल मधील विकास कामांचा आयुक्तांकडून आढावा

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकास कामांना आयुक्त मंगेश चितळे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. याचबरोबर महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागांना भेट देऊन सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

१८ जून रोजी महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ-कार्यक्षेत्रअंतर्गत खारघर, सेक्टर-२० येथील मच्छी मार्केटकरिता जागेची आयुक्त चितळे यांनी पाहणी केली. तसेच खारघर, सेक्टर-३६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरक्षित भूखंड क्र.१७, खारघर मधील महापौर बंगल्याचे बांधकाम त्याचबरोबर खारघर, सेक्टर-२० परिसराचीही आयुवत चितळे यांनी पाहणी केली.

याचबरोबर महापालिका कार्यक्षेत्रातील धानसर, किरवली, तुर्भे, पिसार्वे, करवले, आदि गावांमधील सोयी-सुविधांचा आढावा आयुवत चितळे यांनी सदर पाहणीत घेतला.

यावेळी आयुवतांसमवेत उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मालमत्ता विभाग प्रमुख जयराम पादीर, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, १९ जून रोजी आयुवत मंगेश चितळे यांनी कृष्णाळे तलाव, वडाळे तलाव परिसराची पाहणी केली. यानंतर त्यांनी नाट्यगृहालगत पार्किंगच्या कामाला भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नूतन गुजराती शाळा, दि. बा. पाटील शाळा या शाळांना भेटी दिल्या. याचबरोबर आदई सर्कल येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट ॲकॅडमीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

खांदा कॉलनी ब्रीजला लागून पनवेल महापालिका मुख्यालयाची भव्य दिव्य ‘स्वराज्य' इमारत उभारली जात आहे. या मुख्यालय वास्तुच्या सद्यस्थितीचाही आयुक्तांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी आयुवत चितळे यांनी महापालिका मुख्यालयाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका जलवाहिन्यांनी अडवली पादचाऱ्यांची वाट