ऐरोली खाडीकिनारी महापालिका तर्फे जनसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) डॉ. अजय गडदे, परिमंडळ-२ उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली सेक्टर-१० येथील जैवविविधता केंद्र शेजारील खाडी किनारी ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या  विशेष स्वच्छता मोहीम मध्ये महापालिका ऐरोली विभाग सहाय्यक आयुक्त अशोक अहिरे, स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, सफाई मित्र, पर्यवेक्षक, श्रीमती  सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील एनएसएस विद्यार्थी तसेच दिवा कोळीवाडा आणि ऐरोली सेवटर-१० परिसरातील रहिवाशांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या मोहिमेमध्ये ऐरोली खाडी किनाऱ्यालगतचा ३० गोणी प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा करण्यात आला.

यावेळी स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. याशिवाय उपस्थितांमध्ये पर्यावरण विषयक जागरुकता करून प्लास्टिक प्रतिबंधाबाबत स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी मार्गदर्शनही केले. याप्रसंगी प्लास्टिक वापर प्रतिबंधाबाबत शपथ देखील घेण्यात आली.

‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४' अभियानाला सामोरे जाताना नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून, यामध्ये महापालिका तर्फे नागरिकांचा सहभाग करुन घेण्यावर भर देण्यात येत आहे. - सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रशासनाच्या तंटानाद विरोधात स्वराज्य पक्ष तर्फे घंटानाद