ऐरोली मधील ३ अनधिकृत बांधकामे निष्कासित

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ऐरोली सेक्टर-३ मध्ये करण्यात आलेली ३ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई महापालिका तर्फे करण्यात आली.

महापालिका जी विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्गत ऐरोली सेवटर-३ मध्ये घर क्रमांक-जे-४८ आणि जे-१९४ या दोन घरांच्या जागी आरसीसी इमारतीचे बांधकाम महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. तसेच घर क्रमांक-जे-१८५ या घराच्या जागी महापालिकेच्या परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम करण्यात आले होते.

या अनधिकृत बांधकामांस महापालिका ऐरोली जी विभाग कार्यालय मार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतु, संबंधितांनी महापालिकेच्या नोटीसला न जुमानता अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. अखेर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सदर अनधिकृत बांधकामे महापालिका ऐरोली विभाग कार्यालय मार्फत तोडक मोहीमेचे आयोजन  निष्कासित करण्यात आली. तसेच सदर कारवाई अंतर्गत ५० हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.या धडक कारवाईसाठी एकूण ८ मजूर, १गॅस कटर, २ इलेक्ट्रिक हॅमर यांचा वापर करण्यात आला. यावेळी महापालिका ऐरोली विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई यापुढेही महापालिका द्वारे करण्यात येणार आहे, असे महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळी खेकड्यांचे बाजारात आगमन