एपीएमसी आवारात बेकायदा कारखानदारी

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मसाला मार्केट मध्ये अनधिकृतपणे कारखाने सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे बदामावर प्रकिया करणारा प्रकल्प बसवून बदाम फोडण्याचा कारखाना सुरु करण्यात आलेला आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने त्यामुळे तकारदारांनी पोलीस ठाणे मध्ये धाव घेतल्याने याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना ‘एपीएमसी पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला दिल्या आहेत.

एपीएमसी कायद्यानुसार बाजार समिती  केवळ शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी-विक्री वगळता इतर कोणत्याही प्रकारचे औद्योगिकीकरण करता येत नाही. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन एपीएमसी मसाला मार्केट मध्ये बदाम आणि अक्रोड फोडण्याचा कारखाना सुरु आहे, अशी तक्रार येथील आजुबाजुच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे. मसाला बाजारातील जी विंग मध्ये ८-१० या गाळ्यात अधिकृतपणे बदामावर प्रकिया केली जात आहे. मार्केटमध्ये सामायिक जागेत देखील या प्रकियाचा कचरा वेचला जातो. याशिवाय येथे बदाम निवडून काढले जात आहेत. बदाम कारखान्यात बदाम, अक्रोड फोडले जात असल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असून, त्याचा त्रास येथील व्यापारी, कामगार आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सोसावा लागत आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे तक्रार करुन देखील बाजार समिती प्रशासन डोळे झाक करत असल्याने तक्रारदारांनी पोलीस ठाणे मध्ये धाव घेतली आहे. तर सदर बाब मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाशी निगडित असल्याने या प्रकरणी उचित कार्यवाही करण्याच्या सूचना ‘एपीएमसी पोलीस ठाणे'च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बाजार समिती सचिवांना दिल्या आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून एपीएमसी मसाला बाजारातील जी विंग ८-१० या ठिकाणी बदाम आणि अक्रोड फोडण्याचा अधिकृतपणे कारखाना सुरु आहे. ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती' म्हणजे शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्रीसाठी निर्माण केलेली बाजारपेठ आहे. मात्र, या ठिकाणी अनधिकृतपणे औद्योगिकीकरण होत आहे. याशिवाय या प्रोसेसिंग मिनिट मध्ये मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरत असून, बाहेर पडणाऱ्या भूशामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. याबाबत  वारंवार तक्रार करून देखील कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. - सरफराज जालियावाला, तक्रारदार - नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पालक सचिवांकडून जिल्ह्यातील खड्डे, धोकादायक इमारती, होर्डिंग, नाले सफाई, आरोग्य सुविधांचा आढावा