नवी मुंबईत ‘राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष’ सुरू

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या समाजकारणात राज ठाकरे संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात ,रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या, असा सल्ला कायम राज ठाकरे देत असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नवी मुंबई मनसेच्या वतीने "राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्षाच्या" पोस्टरचे अनावरण  शिवतीर्थावर  राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज ठाकरे यांनी सदर उपक्रमाची स्तुस्ती करून मार्केट , मंदिरे , रेल्वे स्टेशन, अश्या विविध गर्दीच्या ठिकाणी सदर पोस्टर लावण्याच्या अशा सूचना दिल्या.

यंदा राज ठाकरे यांचा वाढदिवस नवी मुंबई मनसे अनोख्या पद्धतीने साजरा करत आहे. त्यांच्या ५६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई मनसेच्या वतीने नवी मुंबईकरांसाठी "राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष" सुरू करण्यात येत आहे. नवी मुंबई मनसेचे आरोग्यदूत वैद्यकीय सेवा देत जनतेच्या सेवेसाठी या माध्यमातून कायम तत्पर असणार असल्याचे मत नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे.

अनेकदा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रशासकीय काम, इतर वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी मदतीची गरज असते. अनेकवेळा रुग्ण हा अत्यंत नाजूक परिस्थितीत असतो. त्याच्यासोबत बाहेरून आलेले नातेवाईक हे एक किंवा दोन व्यक्ती असतात. अनेकवेळा नातेवाईकही भांबावलेल्या स्थितीत असतात. नेमकं हॉस्पिटल परिसरामध्ये कुठे काय आहे ? कुठे कोणत्या चाचण्या केल्या जातात. कागदपत्रांची पूर्तता कशी केली जाते. त्यासाठी कुठे जावं लागतं, याबाबत अधिक माहिती नसलेले नातेवाईक यांना मदत करण्याचं मोलाचे काम आता मनसेचे आरोग्यदूत करणार आहेत. तसेच रुग्णालयात बेडची उपलब्धता करून देणे , खाजगी रुग्णालयात बहुतेकदा सर्व सामान्य रुग्णाची हॉस्पिटल बिलांच्या वेळी आर्थिक पिळवणूक केली जाते, त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपचारा दरम्यान धावपळीचा नाहक त्रास होतो , या व  अशा प्रकारच्या अनेक बाबींपासून नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने मनसेचा वैद्यकीय कक्ष यापुढे 24 तास कार्यरत राहणार आहे असे गजानन काळे यांनी सांगितले.

नवी मुंबई मनसेकडून मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक ही जारी करण्यात आला आहे . ९८३३११११२७ या क्रमांकावर गरजूंनी संपर्क केल्यास मनसेचे आरोग्यदूत त्यांच्या मदतीसाठी हजर असणार आहेत.

सदर वैद्यकीय कक्षाचे कामकाज वैद्यकीय दुत म्हणून आप्पासाहेब कोठुळे, अजय मोरे , सुहास मिंडे, संदेश डोंगरे , सागर विचारे,शरद डीगे,नितीन नाईक,निखिल थोरात, संदीपसिंग बघणार आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरात पाणी कपातीत वाढ