नुकसानदायक क्रोधाला आवरा

सध्याचे संवत्सर हे क्रोधीनाम संवत्सर आहे. या क्रोधामुळेच, युद्ध, भांडण, फोडाफोडी राजकारण वाढत असतं. जे पिंडी ते ब्रम्हांडी! असा हा क्रोध सगळीकडे पसरला आहे. कितीतरी सद्‌गुरू, क्रोधावर कसं नियंत्रण करावे ते सांगतात. पण अजून तरी कुठे क्रोध पूर्ण संपला असं बघायला मिळत नाही.

क्रोधी नावाचा एक पूर्वी सिनेमा आला होता. क्रोध माणसाचा शत्रू आहे असं नेहमी म्हटलं जातं. बऱ्याच सिनेमांमध्ये अपमानानंतर क्रोधित होवून, पुश घेऊन, माणूस स्वतःच्या जीवनात पुढे जायचं ठरवतो. सूड घ्यायचे ठरवतो. क्रोध आल्यावर आपण जे बोलतो, त्याने दुसऱ्याला जेवढी इजा होते तेवढीच आपल्या स्वतःलापण होत असते असं म्हणतात. अर्थात काही काही माणसे याला अपवाद पण असतात. ते जर कोंडी झाली की तुम्ही काहीही करा, क्रोधाने एकत्र येतात आणि दुसऱ्यांना त्रास देत राहतात.

कधी कधी हा क्रोध व्यक्त करणारी व्यक्ती एकच असते असे नाही. अनेकपण असतात. कधी कधी हा क्रोध शब्दातून व्यक्त होतो, असेही नाही. चेहऱ्यावरच्या भावातून होतो. वर्तणुकीतून होतो,  टाळण्यामधून होतो,  पैसे देणं नाकारण्यामधून होतो. अपमानास्पद वागणूक देण्यावरून होतो. थातूरमातूर गिपट देण्यामधून सुद्धा होतो. क्रोध येणं, भावना उफाळून येणं, हे प्रत्येकाच्या आपल्या वैयक्तिक मानसिक रचनेप्रमाणे असतं. कुणाला एखाद्या गोष्टीच खूप दुःख होतं, एखाद्या गोष्टीचं होत नाही. त्या त्यावेळी तो इम्पॅक्ट कसा बसेल त्याच्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ तीन चित्रपटातली तीन उदाहरणे देणार आहे.

१ पहिले तर बसेरा म्हणून एक चित्रपट असतो ज्याच्यात रेखा विधवा होते आणि आपली बहीण विधवा झाली या कल्पनेने राखीला इतका शॉक बसतो, की राखी वेडी होऊन जाते. रेखा तर नवऱ्याचा मृत्यू शांतपणे स्वीकारते, आयुष्यात पुढे जाते. खुश राहते.

२ दुसरं तर राख म्हणून चित्रपट होता. त्याच्यात अमीर खान आपल्या प्रेयसीवर झालेल्या अत्याचारामुळे आयुष्यातून उठतो. प्रेयसी मात्र आयुष्यात पुढे निघून जाते, लग्न करते.

३ सरफरोश झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी नायक एसीपी बनतो.

 एखाद्या कार्यक्रमात एकाच वेळी अनेक जणांना अपमानास्पद बोललं जातं. पण एखादीच व्यक्ती त्याच्यावरून प्रेरणा घेऊन स्वतःची प्रगती करते. अपमानाचा सूड घेणे एका वयात शक्य असते. मी लिहिते म्हणजे मी वेगळी आहे असं नाही. मला पण तुमच्या सारखा राग येतो, हताशच वाटते. पण मन मारून गप्प बसावं लागतं. काहीजण उतारे अंगारे धुपारे मंत्र टाकून शत्रुनाश विधी असे अंधश्रद्धेचेही प्रकार करायला लागतात. ज्याची त्याची वृत्ती असते.

मी अशीच आहे किंवा बाई मी अशीच किंवा मी हा असा, असं म्हणून माणसं मीच एक बाजीराव, मीच एक मस्तानी, मीच एक महाराणी, मीच एक गुरु, अशा स्टाईल बोलत असतात. तो त्यांचा अहंकार असतो. तो त्यांच्यातला क्रोध असतो. त्यांच्या अहंकाराला धक्का लागला की त्यांचा क्रोध विष फेकू लागतो. ही मानवी वृत्ती आहे. त्याच्यात वेगळं काही नाही. आपण या दंशांंनी, या विषाने जखमी झालो, तर तो आपला दोष असतो. कारण की आपण या विषारी माणसांमधला सामान्य अवगुण ओळखू शकत नाही. भांडण लावणं, अपमान करणं, वाद या गोष्टी अगदी सामान्य असतात. पैसा, तोंड, शब्द, अहंकार, काम करणं, या कारणामुळे खूप भांडणं होत असतात.

इतरांच्या क्रोधावरपण उपाय आपल्या आपल्यालाच करावा लागत असतो. बाहेरचा पाऊस आपण थांबवू शकत नसतो तर आपल्याला रेनकोट घालावा लागतो. मी हे सांगते लिहिते ठीक आहे; पण मलापण ते सोप्पं नसतं किंवा कधी कितीदा तर अशक्य असतं. हा उपाय आपल्याला स्वतःच करावा लागतो. उदाहरणार्थ आजार झाल्यावर डॉक्टर म्हणतात, ते बघा हा व्यायाम तुमचा तुम्हीच करायचा आहात. व्यायाम तुम्हाला डॉक्टरच्या गोळीने होणार नाही. असं आहे. पण बाई मी अशी म्हणून स्वतःचा अहंकार जोपासत राहतो, ते टाळणेसुद्धा अवघड असते. मला कुठेही जायला ना सोबत हवी असते. जी माझी व्यथा, सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणायला हवा.सगळीकडे सोबत कशी मिळणार ?
का बर माणूस सोबतीच्या अपेक्षा करतो? मला आठवतं, बाईला बाळंतपणाच्या वेळी पण आई जवळ असावी आणि हात धरलेला असावा, असं वाटतं. का? भीती  वेदना ? वेदनेत सहभागी कुणी झालं की दुःख ५० टक्के कमी होतं असं म्हणतात, हे कारण असेल का? का ही मानसिकता असेल ? एकट्याने किती तरी जण व्यवस्थित राहतात. भ्रामक किंवा वर्चुअल असे मित्र,  मैत्रिणी, परिचित, ओळखीचे, असा एखादा समूह असतो. पण तरीही जरा जुन्या काळच्या लोकांना मात्र, एकटेपण जास्त वाटू शकते. कुणीतरी हवं असं वाटतं. एकाकी पण खूष राहणे ही मानसिकता असावी.

एका मानसशास्त्रज्ञांनी त्यावर सांगितलेलं की कुणावर तरी अवलंबून राहणे, सोडून द्यायचे. पण माणसाच्या मनात ती डिपेंडन्सची रुजलेली असते. लहानपणापासून आईच्या पदराला लटकायची सवय लागलेली असते. मी ठरवते आता कुठे अडकून घ्यायला नको. काही दिवसांनी जे ग्रुप केलेत ना लोकांचे सगळे बंद करणार आहे. बोअर आहेत, फोनवर वेळ खाल्ला, चहाला येतो वगैरे बडबड केली की वेळ जातो, कोणी घरी भेटायला येईल तो असं म्हटलं की मी टाळते. मी सांगितलं लिपट बंद आहे तर त्या व्यक्ती म्हणे जिना चढून येतो म्हणतात. मग मी कसं तरी टाळते, पण कधी कधी निवडक सोबत हवी असते. एकटेपणात सुद्धा क्रोध असतो. तो आपण आत वळवलेला असतो. आपल्या चुकांबद्दल खंत तिथे दुःखद हा एक प्रकारचा स्वतःवर, आत वळवलेला क्रोध असतो. याच्यावर काहीच उपाय नाही. सध्याचे संवत्सर हे क्रोधीनाम संवत्सर आहे. या क्रोधामुळेच, युद्ध, भांडण, फोडाफोडी राजकारण वाढत असतं. जे पिंडी ते ब्रम्हांडी! असा हा क्रोध सगळीकडे पसरला आहे. कितीतरी सद्‌गुरू, क्रोधावर कसं नियंत्रण करावे ते सांगतात. पण अजून तरी कुठे क्रोध पूर्ण संपला असं बघायला मिळत नाही.

ओमेन सिक्सटी सिक्स नावाचे चित्रपटात, एक दुष्ट शक्ती सगळीकडे गोड आणि सुंदर रूप घेऊन लहान बालकासारखी निरागस असल्यासारखा, भ्रम निर्माण करत वावरत असते. फसवते आणि ती सगळ्यांचा बळी घेत असते. शेवटी सुद्धा सगळे मरतात आणि हा ओमेन ६६ जिवंत राहतो. तसा जगात कुठे ना कुठेतरी क्रोध जिवंतच राहतो. क्रोधाने फक्त जास्ती नुकसान करणार नाही  इतपत आपण त्याला नियंत्रणात ठेवावं, एवढेच आपल्या हातात आहे. - शुभांगी पासेबंद 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मना सज्जना लेखमाला (लेखांक ४४)